मुंबई – भारताच्या राष्ट्रपतींनी, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१७ च्या कलम १) ने बहाल केलेल्या अधिकारांचा उपयोग करीत, एस / श्री न्यायमूर्ती अविनाश गुणवंत घरोटे, नितीन भगवंतराव सूर्यवंशी, अनिल सत्यविजय किलोर, मिलिंद नरेंद्र जाधव, मुकुंद गोविंदराव सेवलीकर, वीरेंद्रसिंह ज्ञानसिंह बिष्ट, देबद्वार भालचंद्र उग्रसेन, श्रीमती मुकुलिका श्रीकांत जवळकर, सुरेंद्र पंढरीनाथ तावडे आणि नितीन रुद्रसेन बोरकर या मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशांची, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यासंदर्भातील अधिसूचना आज विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाने जारी केली.