नवी दिल्ली – बाइक रायडर्सनी लांब अंतराच्या प्रवासात बाइकला फोन कनेक्ट करू नये. असे करणे धोकादायक ठरू शकते असा इशारा Apple कंपनीने युजर्सना दिला आहे. बाइकला आयफोन जोडणे टाळावे, असे आवाहन Apple ने केले आहे. त्यामुळे फोनचा कॅमेरा खराब होऊ शकतो असे कंपनीचे म्हणणे आहे. Apple Support Forum च्या नव्या पोस्टनुसार iphone चे कॅमे-यांचे हाय एप्लीड्यूड व्हायब्रेशनवर खराब होण्याची शक्यता आहे. जेथे हाय पॉवर मोटर इंजिन चालते तेथे iphone ठेवल्यास फोनच्या कॅमे-याचे नुकसान होऊ शकते. युजर्सनी iphone मोटरसायकलच्या हँडल बाईवर लावून चालवू नये असा सल्ला कंपनीने दिला आहे. The Verge च्या वृत्तानुसार, iphone कॅमे-याच्या ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनबाबत (ओआयएस) मुख्य समस्या आहे. आयओएस सिस्टिमला ड्युराबिलिटीच्या पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. परंतु हाय व्हायब्रेशन एका ठराविक व्हायब्रेशनच्या वर कॅमेरा परफॉर्मन्स खराब करू शकते. त्यामुळे iphone ची फोटो आणि व्हिडिओची गुणवत्ती खराब होऊ शकते. हाय व्हॉल्यून मोटरसायकलसारख्या सुपर बाइक अधिक व्हायब्रेशन जनरेट करते. लहान मोपेड आणि स्कूटर कमी अॅप्लीट्यूड व्हॉल्यूम जनरेट करते. त्यामुळे सुपर बाइकवर iphone लावू नये. तुम्हाला बाइकवर iphone लावायचाच असेल, तर कमी व्हायब्रेशनचे माउंटेड हँडल बाइकवर लावून घ्यावेत. ते iphone च्या आयओएस आणि एएफ सिस्टिमवर कमी परिणाम करतात.