मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स ओम्नी-चॅनेल रिटेल साखळी विजय सेल्स पुन्हा एकदा बहुप्रतिक्षित अॅप्पल डेज सेल घेऊन आली आहे. १६ ऑगस्ट पर्यंत सुरु असणा-या या सेलमध्ये ग्राहकांना सर्व आवडत्या अॅप्पल उत्पादनांवर अफलातून डील्स मिळवता येतील. विजय सेल्सच्या १२५हून अधिक रिटेल दुकानांमध्ये तसेच त्यांच्या वेबसाइटवर ही उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
शोस्टॉपरची घोषणा: १२८ जीबींचा आयफोन १४ एचडीएफसी बँक कॅशबॅकसह केवळ ४२,९०० रुपयांना, ट्रेड इन तसेच एक्स्चेंज बोनसही मिळणार. नियमित किंमत ७९,९०० रुपये असलेला १२८ जीबींचा आयफोन १४ आता केवळ ६९,९०० रुपये एवढ्या आश्चर्यकारक किमतीला उपलब्ध आहे. शिवाय, एचडीएफसी बँकेच्या कार्डामार्फत याची खरेदी केल्यास फ्लॅट कॅशबॅकही दिला जाणार आहे. आणि एवढेच नाही, ग्राहकाने पूर्वीचा स्मार्टफोन विजय सेल्स स्टोअरमध्येच एक्स्चेंज करण्याचा पर्याय निवडला आणि त्याचे एक्स्चेंज मूल्य १५,००० किंवा त्याहून अधिक असेल, तर विजय सेल्सतर्फे आणखी ८,००० रुपयांची सवलत दिली जाईल आणि एकूण सवलत ३७,००० रुपयांवर जाईल. म्हणजेच १२८ जीबींच्या आयफोन १४ची अंतिम किंमत केवळ ४२,९०० रुपये एवढी असेल.
एवढेच नाही. आय फोन्स, मॅकबुक्स, आयपॅड्स, अॅप्पल वॉचेस, एअरपॉड्स प्रो (सेकंड जनरेशन), प्रोटेक्ट प्लस आणि अन्य अॅप्पल अॅक्सेसरीज अशा विविध अॅप्पल उत्पादनांवर एक्सक्लुजिव डील्स व विशेष दरांचे प्रस्तावही दिले जात आहेत.
एचडीएफसी बँक कार्डांवरील कॅशबॅक वजा जाता, आयफोन १४ ६५,९०० एवढ्या आकर्षक प्रारंभिक किंमतीला खरेदी केला जाऊ शकेल, तर आयफोन १४ प्लस केवळ ७५,९४९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकेल. १,१७,९९० एवढ्या प्रारंभिक किंमतीला देऊ केल्या जाणाऱ्या शक्तिशाली आयफोन १४ प्रोच्या माध्यमातून तुम्ही तुमचा अनुभव अधिक उंचीवर नेऊ शकता. तसेच आयफोन १४ प्रो मॅक्स केवळ १,२५,०९९ रुपये एवढ्या किंमतीला खरेदी करू शकता. आणि विसरू नका, आयफोन हा १३ ५८,४९० रुपये एवढ्या प्रारंभिक किंमतीपासून उपलब्ध आहे.
आयपॅड नाइन्थ जनरेशन २५,९९० एवढ्या प्रारंभिक किंमतीला, तर आयपॅड टेन्थ जनरेशन ३८,९९० एवढ्या प्रारंभिक किंमतीला खरेदी केले जाऊ शकते. आयपॅड एअर फिफ्थ जनरेशन ५१,९०० रुपये एवढ्या प्रारंभिक किंमतीला उपलब्ध आहे, तर आयपॅड प्रोची किंमत ७५,६७० रुपयांपासून सुरू होत आहे. या किंमतींमध्ये एचडीएफसी कार्डांवर दिला जाणारा ३००० रुपयांचा कॅशबॅक गृहीत धरला आहे.
एमवन चिपची शक्ती असलेला वैशिष्ट्यपूर्ण मॅकबुक एअर केवळ ७५,९०० रुपयांना, तर एमटू चिपने युक्त मॅकबुक एअर १,०१,९९० रुपयांना उपलब्ध आहे. शिवाय एमटू चिपची शक्ती असलेला मॅकबुक प्रो १,११,९०० रुपये एवढ्या प्रारंभिक किमतीला उपलब्ध आहे आणि एमटू प्रो चिप्सने युक्त मॅकबुक प्रो १,७८,९९० रुपयांना उपलब्ध आहे. एचडीएफसी बँक कार्डांवर दिला जाणारा ५,००० रुपयांचा कॅशबॅक या किमतींमध्ये गृहीत धरण्यात आला आहे.
कॅशबॅकच्या माध्यमातून तुम्ही अॅप्पल वॉचच्या स्वरूपात नवोन्मेषाच्या संपूर्ण विश्वाचा शोध तुमच्या मनगटावरून धेऊ शकता. सीरिज एटमधील अॅप्पल वॉचेसची किंमत केवळ ३९,४९० रुपयांपासून सुरू होत आहे. अॅप्पल वॉच एसईची (सेकंड जनरेशन) किंमत २५,९०० रुपयांपासून सुरू होत आहे, तर अॅप्पल वॉच अल्ट्राची प्रारंभिक किंमत ७७,९९९ रुपयांपासून सुरू होत आहे. एअरपॉड्स प्रो (सेकंड जनरेशन) कॅशबॅकसह २२,९९० एवढ्या आकर्षक किंमतीला तुमची प्रतीक्षा करत आहे.
विजय सेल्समध्ये खरेदी करण्याचा आणखी एक लाभ म्हणजे मायव्हीएस लॉयल्टी प्रोग्राम होय. त्याद्वारे विजय सेल्सच्या स्टोअर्स व ई-कॉमर्स वेबसाइटवरून केलेल्या खरेदीवर ग्राहकांना ०.७५ टक्के लॉयल्टी पॉइंट्स दिले जातात. स्टोअर्समध्ये या पॉइंटचे रिडम्प्शन करताना प्रत्येक पॉइंट हा एक रुपयाएवढा मोजला जातो.
apple iphone special offers discount
vijay sales independence day