पुणे – आजच्या काळात ऑनलाइन पद्धतीने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे, त्यामुळे ऑनलाईन पध्दतीने माल विक्री करणाऱ्या अनेक कंपन्यांनी आपल्या वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करण्यासाठी तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आणल्या आहेत. त्यातच नवरात्र उत्सव, दसरा आणि दिवाळी यासारख्या सणासुदीचा काळात तर विविध प्रकारचे ऑनलाईन सेलची जणू काही स्पर्धा सुरू होती, त्यानंतरही आता फ्लिपकार्ड कंपनीने ऑनलाईन सेलची घोषणा केली आहे.
फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल सुरू झाला असून तो दि. 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या शानदार स्मार्टफोन सेलमध्ये जवळपास सर्व उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स आणि डील्स देण्यात येणार आहेत. या सेल दरम्यान आपल्याला आयफोन खरेदी करायचा असेल, तर सेलमध्ये उपलब्ध नवीनतम iPhones वर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊ…
आयफोन 12
अॅपलचा iPhone 12 फ्लिपकार्टवर 56,999 रुपयांच्या किंमतीत देण्यात येत आहे. या डिव्हाइसवर 2000 ची सूट आहे. तसेच Axis बँकेकडून 5 टक्के कॅशबॅक आणि ICICI बँकेकडून 10 टक्के सूट आहे. यासोबतच 14,250 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि प्रति महिना 1,949 रुपयांची नो-कॉस्ट ईएमआय उपलब्ध असेल. iPhone 12 मध्ये 6.1-इंचाचा XDR डिस्प्ले, A14 बायोनिक चिपसेट आणि 12MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.
आयफोन 12 मिनी
आयफोन 12 मिनी हा 44,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. या फोनवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. एवढेच नाही तर ग्राहकांना अॅक्सिस बँकेकडून पाच टक्के कॅशबॅक मिळणार आहे. त्याच वेळी, हे डिव्हाइस 1,538 रुपये प्रति महिना EMI शिवाय खरेदी केले जाऊ शकते. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर iPhone 12 Mini मध्ये 12MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि A14 बायोनिक प्रोसेसर देण्यात आला आहे.
आयफोन SE
iPhone SE स्मार्टफोन 29,999 रुपयांच्या किंमतीसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. या डिव्हाइसवर अॅक्सिस बँकेकडून पाच टक्के कॅशबॅक दिला जाईल. तसेच यावर 15 टक्के सूट मिळेल. याशिवाय, 1,026 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर डिव्हाइस खरेदी केले जाऊ शकते. iPhone SE तीन स्टोरेज आणि कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या हँडसेटमध्ये 4.7-इंचाचा HD डिस्प्ले, 12MP रिअर कॅमेरा आणि 7MP फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये A13 बायोनिक चिप सेट उपलब्ध असेल.