मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एप्पल कंपनीचे आयफोन हे एक मृगजळ आहे, असे म्हणतात ते उगाच नव्हे. कारण आज तुम्ही आयफोनचे जे मॉडेल खरेदी केले, ते कुठल्या क्षणी आऊटडेटेड होतील, याची खात्री नसते. त्यामुळे त्याच्या मागे जेवढे धावाल, तेवढे ते हाती येणे अशक्य आहे, असे आयफोन्सच्या बाबतीत नेहमीच म्हटले जाते.
सध्या एप्पल कंपनीच्या आयफोन१४ ची सिरीज सर्वाधिक अपडेटेड आहेत. अर्थात iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone Pro, iPhone 14 Pro Max हे मॉडेल सर्वाधिक अद्ययावत आहेत. पण तुम्ही यावर आनंदी असाल, तर तुमच्यासाठी एक नवी बातमी एप्पल कंपनीकडून आली आहे. आणि ती म्हणजे iPhone 14 च्या मालिकेतील सर्व मॉडेल्सला मागे टाकणारे iPhone 15 हे मॉडेल लवकरच मार्केटमध्ये येणार आहे. ज्या क्षणी हे मॉडेल मार्केटमध्ये येईल, iPhone चे एक मॉडेल मार्केटमधून बाद होईल.
एप्पल कंपनी अश्याच पद्धतीने काम करते आणि विशेष म्हणजे एप्पलचे फोन्स नियमीत वापरणाऱ्या ग्राहकांना देखील याची जाणीव आहे. त्यामुळे त्याचा फार मोठा धक्का बसणार आहे, असेही नाही. परंतु, iPhone ची नवी सिरीज आल्यानंतर कोणते मॉडेल बंद होईल, हे अद्याप कंपनीने जाहीर केलेले नाही, त्यामुळे ते एक मोठे सरप्राईज असणार आहे. हे सरप्राईज अनेकांना महागात देखील पडू शकते. कारण अनेकांनी ते मॉडेल अलीकडेच खरेदी केलेलेही असू शकते.
iPhone 12 जाणार?
एप्पल कंपनीचा iPhone 12 मार्केटमधून हद्दपार होणार आणि त्यानंतरच नवी सिरीज लॉन्च होणार, असे बोलले जात आहे. ज्यावेळी iPhone 12 बंद होईल, तो एप्पलच्या कोणत्याही स्टोअरमध्ये मिळणार नाही. म्हणजे एखाद्याला आयफोन घ्यायचा असेल तर त्याने सध्या काही दिवस प्रतीक्षा केलेलीच बरी, असेच कंपनीला सूचवायचे असेल.
Apple iphone Outdated Discontinue