मुंबई – जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी असलेल्या Apple ने भारतातील आयफोनच्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. कंपनीने आपला फ्री रिपेअर प्रोग्राम बंद करण्याची घोषणा तीन वर्षांपूर्वीच केली होती. या रिपेअर प्रोग्रामअंतर्गत Apple तर्फे आयफोनची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती मोफत करून दिली जात होती. पण आता ही सेवा बंद केली जात आहे.
ऑगस्ट २०१८ मध्ये Apple iphone 8 डिव्हाइसमध्ये logic boards ची समस्या आली होती. हा एक प्रकारचा उत्पादन दोष आहे. या दोषामुळे स्मार्टफोनच्या स्क्रीनचा वापर करताना समस्या येत होती. यामधील काही डिव्हाइसमध्ये रिस्टार्टची समस्या समोर आली होती. तर काही डिव्हाइसमध्ये पॉवर फेलची समस्या होती. अशी समस्या निर्माण होणारे फोन ऑस्ट्रेलिया, चीन, हाँगकाँग, भारत, जापान, मकाऊ, न्यूझीलंड आणि यूएसमध्ये सप्टेंबर २०१७ ते २०१८ च्या दरम्यान खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे Apple ने असे डिव्हाइस मोफत रिपेअर करून देण्याची घोषणा केली होती. दरम्यान, सेवा बंद करीत असल्याबाबत कंपनीच्या संकेतस्थळावर अद्याप कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
ही सेवा बंद
सध्याच्या परिस्थितीत iphone 8 हा चार वर्षांपूर्वीचा जुना आयफोन झाला आहे. आता या स्मार्टफोनमध्ये स्क्रीनची समस्या खूपच कमी आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे कंपनीने फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा बंद केली आहे. आयफोन १२ आणि आयफोन १२ प्रो स्मार्टफोनमध्ये साउंडची समस्या येत आहे. त्यामुळे आता आयफोन १२ साठी रिप्लेसमेंटची सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच आयफोन ११ चे डिस्प्ले रिप्लेसमेंट आणि एअरपॉड्ससाठी रिप्लेसमेंट ऑफर सुरू करण्यात आली आहे.