मुंबई – सध्याच्या काळात मोबाईल फोन वापरणे ही प्रत्येकाची गरज बनली आहे, परंतु आपल्या मोबाईल फोनमधून डेटा चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते त्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
सुरक्षा संशोधकांचा दावा आहे की, आयफोन वापरकर्त्यांना गोपनीयतेची जाणीव आहे त्यांनी त्यांच्या फोनमधून फेसबुक अॅप त्वरित काढून टाकावे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, आयफोनच्या प्रायव्हसी सेटिंग्जमधील ट्रॅकिंग पर्याय बंद केल्यानंतरही फेसबुक वापरकर्त्यांचा मागोवा घेत आहे.
यूजर प्रायव्हसी लक्षात घेऊन अॅपलने आपल्या iOS 14 ऑपरेटिंग सिस्टमद्वारे अॅप ट्रॅकिंग बंद करण्याची सुविधा दिली होती. तथापि, असे दिसते की फेसबुकने डेटा ट्रॅकिंग घेण्याचा मार्ग बंद केल्यानंतरही तो पुन्हा सापडला आहे. सायबर सुरक्षा संशोधकांनी आयफोन वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसमधून फेसबुक अॅप काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे.
या संशोधकांचा असा दावा आहे की, मोबाईल वापरकर्ताच्या फेसबुक हालचालींचा सतत मागोवा ठेवण्यासाठी तुमच्या आयफोनचे एक्सीलरोमीटर वापरते. याद्वारे फेसबुक वापरकर्ता दिवसभर कुठे कुठे गेला हे कळते. फेसबुकचे विविध अॅप्स आणि सेवा कधी वापरत आहात हे देखील फेसबुक तपासू शकते.
फेसबुकने अॅपलच्या प्रायव्हसी फीचर्सला ‘ब्लफ’ करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या महिन्याच्या सुरुवातीला, फोर्ब्स सायबर सुरक्षा लेखक जॅक डफमन यांनी आयफोन वापरकर्त्यांना इशारा दिला की, फेसबुक तुम्ही घेतलेल्या फोटोंमधून गोळा केलेला मेटाडेटा आणि तुमच्या आयपी पत्त्याद्वारे स्थान डेटा कॅप्चर करू शकते. वापरकर्त्याने लोकेशन ट्रॅकिंग बंद केले, तरीही फेसबुक माहिती गोळा करत राहते.