नागपूर – अॅपल आयफोन १३ सीरिज येऊन जास्त दिवस झालेले नाहीत. आयफोन १४ शी संबंधित सर्व तपशील आता समोर येऊ लागले आहेत. ConceptsiPhone या प्रसिद्ध यूट्यूब चॅनलने अॅपल आयफोन १४ चा एक टिझर व्हिडिओ प्रसारित केला आहे. iPhone १४ मध्ये सेकेंडरी स्लायडर स्क्रिन आणि एअर चार्ज टेक्नॉलॉजीसारखे फिचर्स दिले जाणार आहेत असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. आधी कोणत्याच आयफोनमध्ये हे फिचर मिळालेले नाहीत.
व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहे की, सेकेंडरी डिस्प्लेचा वापर किबोर्ड किंवा गेमिंग कंट्रोल्ससाठी केला जाऊ शकतो. त्याशिवाय तुम्ही एकत्र दोन अॅप्सवर काम करू शकणार आहात. म्हणजेच दुसर्या स्क्रिनचे मुख्य काम तुमची क्रियाशीलता वाढविणे हे आहे. या कॉन्सेप्ट डिझायनमध्ये एअर चार्ज टेक्नॉलॉजी सादर करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून केबल न जोडता फोन चार्ज करू शकता येणार आहे. त्यासाठी त्यासाठी तुम्हाला डिव्हाइस एका चार्जिंग पॅडवर ठेवावा लागेल.
कॉन्सेप्ट डिझाइनमध्ये फेस आयडीसह टच आयडीचे फिचर सुद्धा दाखवण्यात आले आहे. तसेच फोन पाच रंगसंगतीसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्ये ऑप्शन स्कार्लेट, ऑरेंज, व्हाइट, डीप ब्लू, आणि ब्लॅकमध्ये मिळण्याची शक्यता आहे. मागील बाजूने ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश दाखविण्यात आला आहे. कॅमेरा मॉड्युलला एकदम सपाट ठेवण्यात आले आहे. हा आयफोन १२ आणि आयफोन १३ सीरिजच्या धर्तीवर बाहेर निघालेला नाही.
आयफोन १४ च्या डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेर्यासाठी पंच होल कॅमेरा दिला जाऊ शकतो. नुकत्याच आलेल्या एका वृत्तात अॅपल चार्जिंग आणि डाटा ट्रांसफरसाठी यूएसबी टाइप सी कनेक्टरकडे झुकले आहे. त्याशिवाय प्रो मॉडलसाठी २ टीबी स्टोरेज कॉन्फिगरेशन आणि रेग्युलर आयफोन १४ साठी १ टीबी स्टोरेज कॉन्फिगरेशनचे संकेत मिळाले आहेत.