मुंबई – अॅपल कंपनी आपल्या भारतीय वापरकर्त्यांना 3,000 रुपये मिळणार आहेत. हे वाचून तुम्हाला प्रश्न पडला ना. हो पण, हे खरे आहे. अॅपल हा एक मोठा आणि नामांकीत ब्रँड असून त्याच्याकडून घसघशीत तीन हजार रुपये मिळणार असल्याने ती एक सुखद बाब आहे. तुम्हाला हे पैसे मिळतील पण त्यासाठी एक बाब करावी लागणार आहे. तीच आता तुम्हाला सांगितली जाणार आहे.
अॅपल वापरकर्ते त्यांच्या अॅपल आयडीमध्ये पैसे जमा करतात, तेव्हा त्यांना बोनस म्हणून पैसे जमा केले जातील.
अॅपल आयडी मधील पैसे अॅपल कडून विविध सेवा खरेदी करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. तथापि, अॅपलकडून 3,000 रुपयांपर्यंत मोफत मिळवण्यासाठी, वापरकर्त्यांना त्यांच्या अॅपल आयडीमध्ये काही रक्कम जमा करणे आवश्यक आहे. अॅपलची ही ऑफर कशी काम करते ते समजून घेऊ या…
एखाद्या भारतीय वापरकर्त्याने त्याच्या अॅपल आयडीमध्ये 15,000 रुपयांपर्यंत रक्कम जमा केली, तर तो जमा केलेल्या रकमेवर 20 टक्क्यां पर्यंत बोनस प्राप्त करण्यास पात्र असेल. उदाहरणार्थ, जर वापरकर्त्याने त्याच्या अॅपल खात्यात 1,000 रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला तर त्याला अॅपलकडून 20 टक्के बोनस मिळेल, जो 200 रुपये असेल. म्हणजे अॅपल वापरकर्त्यांना 3,000 रुपयांपर्यंत बोनस देईल, जर आपली 15,000 रुपयांचे रक्कम जमा असेल .
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) आवर्ती पेमेंटच्या नवीन निर्देशांमुळे, अॅपल विकासकांना अॅपल आयडी बॅलन्समधून थेट पेमेंट स्वीकारण्यास प्रोत्साहित करत आहे.
अॅपल आधीच भारतीय वापरकर्त्यांना 20 टक्के बोनस देत आहे. ऑफर आधीच सुरू झाली आहे, आणि जर तुमच्याकडे अॅपल डिव्हाइस असेल आणि तुम्ही अॅपल कडून एखादी सेवा विकत घेत असाल तर आपण या 20 टक्के बोनस ऑफरचा त्वरित लाभ घेऊ शकता. याबाबत एका मेलमध्ये, अॅपलने म्हटले आहे केले की, आता वापरकर्ते ग्राहक डिस्ने प्लस हॉटस्टार, बंबल, लिंक्डइन, पिक्सार्ट, कल्ट फिट आणि किडोपिया सारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मची सदस्यता खरेदी करू शकतात. युपीआय रुपे कार्ड, नेट बँकिंग आणि आंतरराष्ट्रीय डेबिट किंवा क्रेडिट कार्ड यासह वापरकर्ता त्याच्या अॅपल आयडीमध्ये पैसे टाकू शकतो, त्यासाठी असे अनेक मार्ग आहेत.