कॅलिफोर्निया – कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता अॅपलने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परतण्याची मुदत वाढवली आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम म्हणजेच घरून काम करण्यासाठी 1 हजार डॉलरचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये कर्मचार्यांसाठी कार्यालय सुरू केले जाणार होते, मात्र त्यानंतर आता दि 1 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आले. अॅपलने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यालये उघडण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. अॅपलने आपल्या रिटर्न ऑफ ऑफिस योजना अनेक वेळा बदलल्या आहेत. अॅपलने यापूर्वी जून, नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, जानेवारी आणि त्यानंतर आता दि. 1 फेब्रुवारीपासून कार्यालय सुरू केले जाईल, असे सांगितले आहे.
सुमारे आठवडाभरापूर्वी कंपनीने कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीपर्यंत परत येण्यास सांगितले होते. आता पुन्हा एकदा ही मुदत वाढवण्याची शक्यता असून पुढील तारीख अद्याप ठरलेली नाही. यावरून असे सूचित होते की, कंपन्यांना त्यांचे कामकाज पूर्वपदावर आणण्याच्या प्रयत्नात संघर्षाचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसच्या उद्रेकाच्या सुरूवातीस, अॅपल ही आपल्या कर्मचार्यांना साथीच्या आजाराच्या वेळी घरी राहण्याचा सल्ला देणारी पहिली यूएस कंपनी होती. त्याचवेळी ते या वर्षी सप्टेंबरमध्ये कार्यालय सुरू करण्याच्या तयारीत होते. त्यानंतर, कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहता, पुन्हा एक महिना ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला, त्यानंतर पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत योजना बदलण्यात आली आणि आता त्यात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे.