विशेष प्रतिनिधी, दिल्ली
‘ रोज एक रोज एक सफरचंद खा, आजाराला दूर ठेवा ‘ असे म्हटले जाते. कारण सफरचंदामध्ये लोह, जिवनसत्व यासह विविध पोषक मुल्य मोठ्या प्रमाणावर असतात. काश्मिरी सफरचंद तसेच हिमाचलमधील किन्नौर सफरचंदांचा गोडवा चांगला असल्याने मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून त्याला मागणी असते. तसेच देशभरात ही सफरचंद खाल्ल्या जातात. मात्र सध्या बाजारात प्रथम आपलीच सफरचंद विकली जावीत किंवा विक्रीला यावीत, या शर्यतीत त्याच्या गुणवत्तेशी तडजोड केली जात आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे सतत वाढत जाणारे तापमान तसेच अधिक नफ्याच्या शोधात अकाली फळे पिकवणे आणि त्यासाठी त्यावर रंगाचे स्प्रे मारणे यामुळे त्याचा मुळे सुगंध आणि चव लुप्त होत आहे.
वास्तविक सफरचंद तोडल्यानंतर १० ते १५ दिवसांनी त्यात उपस्थित स्टार्च साखरेमध्ये बदलतो. तरच त्याचा वास आणि चव चांगली येते. बाजारात जास्त भाव मिळावा म्हणून बागवान आणि होलसेल फळ विक्रेते त्यावर अनेक प्रकारचे स्प्रे चा वापर करत आहेत. यामुळे फळ लवकर न खाल्ल्यास सडते. फळ तज्ज्ञांच्या मते, जुलै आणि ऑगस्टमध्ये, जेव्हा सफरचंद पिकत आहे, दिवसाचे तापमान जास्त असावे आणि रात्रीचे तापमान कमी म्हणजे ६ ते ८ अंश सेल्सिअस असावे. यामुळे सफरचंदची चव वाढते तसेच त्याचा सुगंधही वाढतो. तथापि, हे तापमान हिमाचल खालच्या प्रदेशातील सफरचंदांना उपलब्ध नाही. त्यामुळे औषधाचा वापर केवळ कमी प्रमाणात केला पाहिजे. मात्र सफरचंदाला लाल रंग येण्यासाठी वापरलेला स्प्रे देखील वापरला जात आहे.
काश्मीर, किन्नौर आणि उच्च उंचीच्या भागातील सफरचंद अधिक चवदार आणि सुगंधित आहेत कारण तेथील हवामान त्याच्यासाठी योग्य आहे. तसेच फलोत्पादन आणि वनीकरण विद्यापीठ नौनी, सोलन व्यतिरिक्त, त्याच्या इतर केंद्रांवर सफरचंदांसह इतर फळांवर संशोधन केले जात आहे. सध्या नौनी, कुल्लू आणि किन्नारमध्येही संशोधन केले जात आहे. तेथील हवामानानुसार सर्व प्रदेशांसाठी सफरचंद वाणांची लागवड करण्याची शिफारस केली जात आहे.
नौनी सोलन फळ विज्ञान विद्यापीठातील फलोत्पादन आणि वनीकरणचे विभाग प्रमुख, डॉ.डी.पी. शर्मा म्हणाले की, हवामान बदल आणि अधिक नफा मिळवण्याच्या स्पर्धेमुळे सफरचंदांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. नौनी विद्यापीठात राज्याच्या हवामानाच्या आधारावर संशोधन केले जात आहे. प्रदेशानुसार सफरचंद आणि इतर फळांच्या जाती तयार केल्या जात आहेत. त्यात जुन्या आणि नवीन जाती लावल्या आहेत. नैसर्गिकरित्या उत्पादित फळावर हवामान बदल आणि अंधाधुंद औषध फवारणीमुळे सफरचंदांच्या चव आणि सुगंधावर परिणाम झाला आहे.