मुंबई – राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि त्यांच्या कामकाजात अमुलाग्र बदल होणार आहे. तसे सूतोवाच पणनमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत. हे बदल नक्की काय आणि कसे असणार आहेत, त्याचा नक्की काय परिणाम होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल की तोटा याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी भविष्यात करावयाची वाटचाल, समित्यांनी अधिकाधिक पारदर्शकता ठेवून शेतकरी वर्गास आकर्षित करुन व्यवहारात वाढ करणे, उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधणे आदी बाबींवर चर्चा करुन उपाययोजना सूचवण्यासाठी पणन संचालक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट निर्माण करण्यात आला होता. या अभ्यासगटाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या उत्पन्नवाढीसाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.
धोरणात्मक निर्णयासाठी/ कायदा दुरुस्तीसाठी शासनास सादर केलेले प्रस्ताव-
कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ सुधारणा
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजात सुलभता येण्याच्या दृष्टीने शासनस्तरावरून घ्यावयाच्या धोरणात्मक निर्णयासाठीच्या प्रस्तावामध्ये बाजार फीचे किमान व कमाल दर निश्चित करणे
बाजार समितीमधील अनुज्ञप्ती फी मध्ये दुरुस्ती करणे
बाजार निधी गुंतवणुकीबाबत, बाजार समित्यांना मालमत्ता कर, अकृषिक करातून सुट देणे, बाजार समित्यांना विशिष्ट बाबींसाठी परवानगी देणे
कृषि उत्पन्न बाजार समित्यांमधील अनुकंपा तत्वावरील भरती
बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या वजनमापासाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसविण्यासाठी जागा उपलब्ध होण्याबाबत.
या सर्व प्रस्तावास पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी तत्वत: मान्यता देऊन तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
पणन संचालनालयाने निर्गमित केलेली परिपत्रके
बाजार समित्यांनी उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध व्हावेत यासाठी पेट्रोल पंप, सीएनजी पेट्रोल पंप उभारणीसाठी जागा उपलब्ध करुन देणे
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य व वाजवी दर मिळण्याकरीता धान्यचाळणी यंत्राची उभारणी
बाजारसमितीच्या आवारात मुलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ज्या बाजार समित्या आर्थिक दृष्ट्या सक्षम नसतील त्या बाजार समित्यांनी स्वारस्याची अभिव्योक्ती (Expression of interest) प्रक्रिया राबविणे
कृषी प्रक्रिया संस्थांची प्रकल्प उभारणी विहीत वेळेत व तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रकल्प बांधकाम सल्लागारासाठी/ मशिनरी तांत्रिक सल्लागारासाठी पात्रता निकषाबाबत आणि खाजगी बाजार परवान्यासाठी, थेट परवाना
एकल बाजार परवान्यासाठी अर्ज करताना सादर करावयाची कागदपत्रे व कामकाजाबाबत पणन संचालनालयाच्या मार्गदर्शक सूचना
बाजार समित्यांचा व्यवसाय विकास आराखडा तयार करण्याबाबत, कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सौर उर्जा प्रकल्प राबविणे
तात्पुरते उपबाजार घोषित करणे, बाजार समितीत कृषी चिकित्सालय आणि कृषी तंत्रज्ञान व माहिती केंद्र उभारणे
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी विक्रीचे सौदे सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बंद न ठेवण्याबाबत
राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!