गुरूवार, सप्टेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘आपलं सरकार’ वेब पोर्टल नव्या स्वरूपात येणार…ॲप तयार करण्याचेही निर्देश

by Gautam Sancheti
जानेवारी 6, 2025 | 8:15 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
माहिती

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासनाच्या ४८५ सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देणारे ‘आपलं सरकार’ (1.0) वेब पोर्टल अधिक सक्षम, अद्ययावत करुन नव्या स्वरूपात तयार करावे. त्याचबरोबर नागरिकांना जलद माहिती उपलब्ध होण्यासाठी आपलं सरकारचे ‘ॲप’ तयार करुन या सुविधा मोबाईलवर उपलब्ध होतील या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया, राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या संचालक सपना कपूर, महाआयटीचे प्रकल्प अधिकारी राहुल सुर्वे, महाआयटीचे प्रकल्प अधिकारी किरण पाटील यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, आपलं सरकार ही वेबसाईट अपग्रेड करुन नव तंत्रज्ञानाचा वापर करुन वेबसाईट नव्या स्वरूपात तयार करण्यात यावी. नागरिकांना जलद सुविधा उपलब्ध होतील, तसेच कोणत्याही सेवा सुविधेसाठी अर्ज करताना वेबसाईट वापरण्याची पद्धत सुलभ असायला हवी, अधिक क्षमतेचा रॅम वापरून चॅट बॉट सारख्या सुविधांसह एआय (कृत्रिम बुद्धीमत्तेचा) चा वापर करुन त्या वेबसाईट वापरण्यास सुलभ बनवाव्यात. तसेच आपलं सरकारचे एक ॲप तयार करुन सुविधा ॲपवरुन उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

महाराष्ट्र शासनाच्या 485 सेवा नागरिकांना आपलं सरकार वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. अन्य राज्यांचा यासंदर्भातील अभ्यास करुन महाराष्ट्र शासनाच्या 485 व्यतिरिक्त 285 अधिकच्या नवीन सेवा ऑनलाईन देण्याची तयारी केली असून लवकरच या सुविधा उपलब्ध होतील. यावर महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग आणि महाआयटी कंपनी काम करीत आहे. या सेवा कार्यान्वित झाल्यानंतर 770 सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील ऑनलाईन सेवा देणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये येईल. या दृष्टीने विभागाने तयारी सुरु केली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

केंद्र सरकारने डेटा सुरक्षेसाठी तयार केलेल्या कायद्यानुसार राज्याचा ‘स्टेट ओन क्लाउड’ तयार करण्याचे निर्देशही मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एसटी महामंडळ व्यसनी कर्मचाऱ्यांवर ठेवणार ‘वॉच’….प्रवासी सुरक्षेसाठी पाऊल

Next Post

खासदार भजन स्पर्धा…नागपुरातील ५७८ भजनी मंडळ करणार श्रीकृष्ण भक्तीचा जागर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250904 WA0311
संमिश्र वार्ता

या अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला

सप्टेंबर 4, 2025
bjp11
महत्त्वाच्या बातम्या

भाजपातून सहा नगरसेवकांचे निलंबन…निलेश राणेंचा संताप

सप्टेंबर 4, 2025
Untitled 1
महत्त्वाच्या बातम्या

५८ लाख नोंदीची सरकारकडे माहितीच नाही? मराठा आंदोलनानंतर या वकिलाने केला मोठा दावा

सप्टेंबर 4, 2025
crime11
क्राईम डायरी

सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला २८ लाखाला गंडा

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम, सुट्टीचेही निकष बदलले, मंत्रिमंडळाची मान्यता

सप्टेंबर 4, 2025
crime 71
क्राईम डायरी

नाशिकमध्ये जुन्या वादाची कुरापत काढून तरूणाचा खून….पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सप्टेंबर 4, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
राज्य

मुंबईसाठी २३८ वातानुकूलित लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी ४ हजार ८२६ कोटी रुपयांस मंजुरी….तर पुण्यासाठी हा निर्णय

सप्टेंबर 4, 2025
Next Post
WhatsApp Image 2025 01 06 at 16.57.43 1

खासदार भजन स्पर्धा…नागपुरातील ५७८ भजनी मंडळ करणार श्रीकृष्ण भक्तीचा जागर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011