इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय क्रिकेट संघाचे कसोटी कर्णधारपद विराट कोहलीने सोडल्यानंतर त्याची पत्नी तथा अभिनेत्री अनुष्का शर्माने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अनुष्काने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करीत यासंदर्भात तिचे सविस्तर मनोतगत व्यक्त केले आहे.
विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेनंतर सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. त्याचे चाहते नाराज आहेत तर भारतीय क्रिकेट नियामक आयोग आणि विराट यांच्यात वाद असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत अनुष्काने पती विराटला समर्थन करणारी पोस्ट लिहीली आहे. अनुष्काने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, तुला कधीही पद आणि प्रतिष्ठेचा हव्यास नव्हता. तू सतत कार्यरत रहायचास. सर्वोत्तम करणे हा तुझा ध्यास होता आणि आहे, असे अनुष्काने म्हटले आहे.
अनुष्काची ही पोस्ट अशी
तू कधीही कसलीही अपेक्षा केली नाही. तूझी दाढी सफेद होण्यापासून बऱ्याच काही गोष्टी मी पाहिल्या आहेत. २०१४ पासून ते आतापर्यंत तू अत्यंत सक्षमपणे संघाचे नेतृत्व केले. तूझ्या नेतृत्व आणि यशावर माझे प्रेम आहे. खरं तर मला तुझा अभिमान आहे. जिथे फार अपेक्षा असते तिथेच खरी जास्त परीक्षा घेतली जाते. या कसोटीत तू खरा उतरलास. पूर्ण झोकून देऊन आणि ऊर्जेद्वारे सकारात्मकतेने तू कार्य केले आहेस. ते कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगे आहे. तो एक इतिहासच आहे, असे म्हणत अनुष्काने विराटच्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. गेल्या सात वर्षात घेतलेले धडे आपली मुलगी एक वडिलांच्या रुपात तुझ्यात बघेल, असे म्हणत अनुष्काने पोस्टचा शेवट केला आहे.