मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेत्री अनुष्का शर्मा-कोहली हिचे लग्नानंतर तब्बल ४ वर्षांनी चित्रपटात एन्ट्री होत आहे. तिचा आगामी चित्रपट आहे ‘चकदा एक्सप्रेस’. जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान महिला गोलंदाज झुलन गोस्वामीचा गौरवशाली प्रवास अनुष्का शर्मा-कोहली ही या चित्रपटाद्वारे दर्शवणार आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या वतीने हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला जात आहे. ४ वर्षानंतर अनुष्का पुन्हा चित्रपटात दिसणार असल्याने तिच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हा चित्रपट क्लीन स्लेट फिल्मस निर्मित आहे. प्रोसिट रॉय या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट महान क्रिकेटपटू झुलून गोस्वामीच्या अविश्वसनीय कथेपासून प्रेरित आहे.
या चित्रपट बद्दल सांगताना झुलून गोस्वामी म्हटल्या,”जेव्हा तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करतात, तेव्हा तुमच्या मनात एवढेच असते की तुम्ही देशासाठी खेळत आहात, स्वतः साठी नाही. टीम इंडियाचे नाव इतिहासात नोंदवण्यासाठी ११ महिला खेळत आहेत. मुली क्रिकेट खेळू शकत नाही असे म्हटले तरी हरकत नाही. काही वेळा एखाद्या माणसाच्या कर्तृत्वाला स्वतः वर ठेवलं तरीही काही फरक पडत नाही. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीवर धावतात, तेव्हा तुम्हाला फक्त क्रिकेटची बॅट धरलेला प्रतिस्पर्धक आणि बाद होण्यासाठी आवश्यक असलेले स्टम्प दिसत असतो..”
गोस्वामी पुढे म्हणाल्या की, ’आता महिला चमकताना पाहण्याची वेळ आली आहे. ही आमची वेळ आहे. आम्ही खेळण्यासाठी येथे आहोत. आज, आपण आम्हाला पहावे. उद्या तुम्हाला आमची नावे आठवतील. आम्ही टीम इंडियाचा जयजयकार करत आपल्यासाठी ही कथा घेऊन येत आहोत. आमच्यात सामील व्हा. चकदा एक्सप्रेस आता चित्रीकरण करत आहे. मैदानावर भेटू.”
या चित्रपटसाठी शुभेच्छा सोबतच अनुष्का शर्मा-कोहली ट्रोल होत आहे. काही प्रेक्षकांनी म्हटले आहे की, अनुष्का शर्मा या भूमिकेसाठी योग्य नाही, असे म्हटले आहे. या भूमिकेसाठी अनुष्का शर्माला सावळे रूप घ्यावे लागले आहे. आणि हीच बाब चाहत्यांना आवडलेली नाही. त्यांनी या कास्टचा विरोध दर्शिवला आहे.