विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. मास्क बनविणार्या कंपन्या याबाबत नानाविध दावे करत असतात. त्यातच आता नॅनो टेक्नॉलॉजीने तयार केलेला अँटीव्हायरल मास्क केवळ कोरोना व्हायरसपासून संरक्षणच करत नाही, तर सात तासांपर्यंत व्हायरसचा नाश करण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे चार थरांनी बनवलेला हा मास्क विवेक कोहली एंटरप्रायझेसने फार्म टू फार्म कंपनी इंग्लंडच्या सहकार्याने भारतीय बाजारात आणला आहे. याचे तंत्र यूकेचे शास्त्रज्ञ डॉ.गॅरेथ केव यांनी विकसित केले आहे. यासाठी त्याला पेटंटही मिळाले आहे. विवेक कोहलीने भारत-यूके भागीदारी म्हणून ते देशात आणले आहे.
असा आहे मास्क
मास्कला चार स्तर : या बाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना विवेक कोहली यांनी सांगितले की, या मास्कच्या चार थरांपैकी एक विरियन तंत्रज्ञान आहे, त्यात नॅनो पार्टकिल आणि तांबे यांचा थर लावलेला असून हा थर कोरोना विषाणू काढून टाकतो. त्याचा बाह्य आणि पहिला थर हा हायड्रोफोबिक स्प्लॅश प्रतिरोधक थर आहे. दुसरा थर ए व्हीरीऑन असून आतमध्ये अँटीव्हायरल लेयर आहे. तिसरा थर म्हणजे मेल्टडाउन फिल्टर आणि चौथा थर हायपरलर्जेनिक हायड्रोफिलिक आहे. हा मास्क या आठवड्यापासून भारतात ऑनलाइन उपलब्ध होईल. हळूहळू तो बाजारपेठेत (ऑफलाइन ) देखील उपलब्ध होईल.
खेळाडूंना मास्क मोफत उपलब्ध : विवेक कोहली यांनी पुढे सांगितले की, सदर कंपनीकडून सुमारे ५० हजार मास्क मागवले असून विविध क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंना दिले जातील. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी गरजू खेळाडूंना मोफत मास्क देण्याचा प्रयत्न केला जाईल. वैयक्तिक अनुभवामुळे सध्या ऑक्सिजन कन्सेंट्रेटरचे काम सुरू केले आहे. तसेच हा मास्क वैद्यकीय क्षेत्रात पुढे जाण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे.