विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाच्या संकटात टू डिओक्सी डी ग्लुकोज या औषधाला आपत्कालीन वापराला मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट काहीसे कमी होण्यात मदत होणार आहे. पण, हे औषध बाजारात नक्की कधी येणार याबाबत मोठा खुलासा झाला आहे. संरक्षण, संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) हे औषध विकसित केले आहे. या औषधाच्या उपलब्धतेबाबत डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी यांनी सांगितले की, ये्या २ ते ३ दिवसात हे औषध बाजारात उपलब्ध होईल. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.
टू-डिऑक्सी डी ग्लुकोज हे औषध covid-19 च्या उपचारांसाठी फायदेशीर ठरणार आहे. पावडर स्वरूपात उपलब्ध असलेले हे औषध पाण्यात मिसळून तोंडावाटे घेता येणार आहे. या औषधाच्या आपत्कालीन वापराला डीसीजीआय अर्थात भारतीय औषध नियंत्रण मंडळाने मंजुरी दिली आहे.
डीआरडीओची प्रयोगशाळा असलेल्या आण्विक औषधे आणि तत्सम विज्ञान संस्थेनं डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी यांच्या सहकार्याने हे औषध बनवले आहे. डीसीजीआयनं कोविड रूग्णांवर आपत्कालीन उपचारासाठी या औषधाच्या वापराला परवानगी दिली आहे.
हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (डीआरएल) च्या सहयोगातून संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) या प्रयोगशाळेने कोविड १९ विरोधात उपचारात्मक अनुप्रयोग करण्यासाठी २-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (२-डीजी) हे औषध विकसित केले आहे.
क्लिनिकल चाचणी परिणामांनी असे दर्शविले आहे की, हे रेणू, रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना जलद बरे होण्यास मदत करतात आणि ऑक्सिजन वरील अवलंबित्व कमी करतात. २-डीजीने उपचार केलेल्या मोठ्या प्रमाणावरील रुग्णांची आरटी-पीसीआर निगेटिव्ह दिसून आली. कोविड १९ ग्रस्त लोकांना या औषधाचा प्रचंड फायदा होईल.