नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरासह जिल्ह्यात लाचखोरीला ऊत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध सरकारी विभागांमधील कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडत आहेत. त्यात पोलिस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील नांदगाव येथील तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहाथ सापडला आहे. युवराज मासुळे असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. त्याने २ हजार रुपयांची लाच मागितली होती. शहरातीलक्रांतीनगर येथील व्यक्तीकडे वारस नोंद करण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अधिक माहिती अशी
आरोपी-1) श्री. युवराज रामदास मासोळे, (वय 52 वर्ष, तलाठी, नेमणूक- नांदगाव, तलाठी सजा नांदगाव, जि. नाशिक
लाचेची मागणी- 5000/- रुपये तडजोडी अंती2000/-
लाचेची मागणी व स्विकारली- तारीख – दिनांक 13/06/2022
लाच मागणीचे कारण -. तक्रारदार यांच्या भाची हिने तिचे आईच्या मृत्युनंतर आईचे सामाईक नावे असलेल्या जमीनीच्या 7/12 उताऱ्यावर कायदेशीर नाव लावण्यासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे दिनांक 13/06/2022 रोजी 5,000/- रू. लाचेची मागणी करून, तडजोडीअंती 2,000/- रू. स्विकारण्याची तयारी दाखवून रक्कम रूपये 2,000/- रू. पंच साक्षीदार यांचेसमक्ष स्विकारतांना पकडण्यात आले म्हणून गुन्हा.
सापळा अधिकारी – नरेंद्र पवार, पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि.,नाशिक.
सापळा पथक – पो.हवा/ डोंगरे, पो.ना./ इंगळे, सर्व नेमणूक- ला.प्र.वि, नाशिक
मार्गदर्शक- 1) मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
2)मा.श्री. नारायण न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक,ला. प्र. वि. नाशिक
3)मा. श्री. सतीश भामरे, पोलीस उपअधीक्षक, वाचक, ला.प्र.वि. नाशिक.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा. जिल्हाधिकारी, नाशिक.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक @ टोल फ्रि क्रं. 1064