नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षकाला ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) याबाबत सापळा रचला होता. जुन्या तहसील कार्यालयातील भूमीअभिलेख कार्यालयात आज हा सापळा यशस्वी ठरला. विलास पांडुरंग दाणी (वय ४४) असे या उपअधीक्षकाचे नाव आहे. त्याने तक्रारदाराकडून ३० हजारांची लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क करून याबाबतची तक्रार केली.
एसीबीने दिलेली माहिती अशी
युनिट – धुळे
तक्रारदार- पुरुष,वय-44 वर्ष.
लाच घेतना पकडण्यात आलेला अधिकारी :- विलास पांडुरंग दाणी वय -49, पद – उपअधीक्षक भुमी अभिलेख,वर्ग-2 नांदगाव जि. नाशिक. रा. प्लाट 9, आरंभ, चिंतामणी कॉलनी, इंदिरा नगर, नाशिक.
लाचेची मागणी- 50000/-₹
लाच स्वीकारली- 40000/-(पहिला हप्ता)
लाचेची मागणी – ता. 29/03/2022
लाच स्वीकारली -ता. 29/03/2022
लाचेचे कारण – तक्रारदार व त्यांचे भागीदार यांचे भुखंडाचे अति तातडीचे बिनशेती मोजणी करून त्याचा नकाशा तयार करून देण्याच्या मोबदल्यात आलोसे यांनी 50,000/- रुपयांची मागणी केली, त्या अनुषंगाने सापळा कारवाई केली असता आलोसे यांनी पंच साक्षीदारांसमक्ष 40,000/- रु स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वीकारले. सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी
श्री. अनिल बडगुजर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.धुळे
सापळा अधिकारी
श्री.मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.धुळे
सहा. सापळा अधिकारी
श्री.प्रकाश झोडगे , पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.धुळे
सापळा पथक:-
कैलास जोहरे ,कृष्णकांत वाडीले,प्रशांत चौधरी,महेश मोरे, संदिप कदम, राजन कदम,शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा, भूषण शेटे,चालक सुधीर मोरे जगदीश बडगुजर.
मार्गदर्शक –
मा.श्री सुनील कडासने सो. पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र.
मा.श्री नारायण न्याहळदे सो. अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र.
मा.श्री सतीश भामरे सो वाचक,पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि नाशिक परीक्षेत्र.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. अँन्टी करप्शन ब्युरो,धुळे. दुरध्वनी क्रं. 02562-234020 मोबा.क्रं. 8999962057, 9922447946,9657009727 टोल फ्रि क्रं. 1064