पाचोरा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील वरसाडे येथील ग्रामसेवक आणि सरपंचाच्या पतीला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली आहे. काशिनाथ राजधर सोनवणे असे ग्रामसेवकाचे नाव आहे तर शिवदास भुरा राठोड असे महिला सरपंचाच्या पतीचे नाव आहे. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीने दिलेली माहिती अशी यशस्वी सापळा
युनिट – जळगाव.
१) काशिनाथ राजधर सोनवणे, वय-52, व्यवसाय-नोकरी, ग्रामसेवक,ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. ता.पाचोरा जि.जळगाव वर्ग-३
(रा.प्लॉट नं.३, शिवनेरी नगर,भडगाव रोड, चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगांव.)
२) शिवदास भुरा राठोड, -67, खाजगी इसम (वरसाडे प्र.पा.ग्रामपंचायतीचे महिला सरपंच यांचे पती) रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा, जि.जळगाव.
लाचेची मागणी- प्रथम 6,000/-रू.तडजोडीअंती 4,000/-रु.
लाच स्विकारली- 4,000/-रु.
हस्तगत रक्कम- 4,000/-रू.
लाचेची मागणी – दि.24/05/2022
लाच स्विकारली- दि.24/05/2022
लाचेचे कारण -.
तक्रारदार हे ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. अंतर्गत होणाऱ्या रोजगार हमी योजने अंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवक म्हणून काम केले असून त्यांचे मिळणारे मानधनाच्या धनादेशावरती सही देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे क्रं.1 यांनी स्वतःसाठी व आरोपी क्रं.2 यांचेसाठी प्रथम पंचासमक्ष 6,000/-रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 4,000/-रुपये लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम आरोपी क्रं.2 यांचेकडेस देण्यास सांगितल्याने सदर लाचेची रक्कम आरोपी क्रं.2 यांनी स्वतः पंचासमक्ष व आरोपी क्रं.1 यांच्या समक्ष ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. कार्यालयात स्वीकारली म्हणून गुन्हा.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी-
श्री.शशिकांत एस.पाटील, पोलीस उप अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो,जळगाव
तपास अधिकारी-
श्री.संजोग के.बच्छाव , पोलीस निरीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव.
सापळा व मदत पथक-
DYSP. श्री.शशिकांत एस.पाटील, PI.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ.
मार्गदर्शक-
1) मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2) मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3) मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
आरोपीचे सक्षम अधिकारी- मा.मुख्य कार्यकारी. अधिकारी सो.जिल्हा परिषद कार्यालय,जळगाव
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
@ मोबा.क्रं. 8766412529
@ टोल फ्रि क्रं. 1064