नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तब्बल ४ लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या उपविभागीय अभियंता, सहाय्यक अभियंता आणि एका एजंटला अटक करण्यात आली आहे. गुरांच्या दवाखान्याची इमारत पूर्ण झाल्याने त्याचे बिल मंजूर करण्यासाठी तब्बल ४३ लाखांची लाच मागणाऱ्या आणि त्याचा पहिला हफ्ता म्हणून ४ लाख रुपयांची रक्कम स्विकारण्यात आली. तब्बल ४३ लाख रुपयांची लाच मागण्याचा हा प्रकार सध्या राज्यभरातच चर्चेचा ठरत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी
युनिट:- नंदुरबार
तक्रारदार:-* पुरुष, वय – 59 वर्षे
आरोपी:-* 1) सुनील दिगंबर पिंगळे, वय 48 वर्ष, उप उपविभागीय अभियंता, श्रेणी-1 जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, अक्कलकुवा जि. नंदुरबार
2) संजय बाबुराव हिरे, वय 52 वर्ष, सहाय्यक अभियंता श्रेणी-2, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अक्कलकुवा जि. नंदुरबार
3) अभिषेक सुभाष शर्मा, वय 32 वर्ष, रा. नंदूरबार, खाजगी इसम
*पडताळणी:-* दि.23.03.2022
*सापळा कारवाई:-* दि.23.03.2022
*लाचेची मागणी:-* 43,75,000/- रुपये (43 लाख 75 हजार रुपये). यापैकी पहीला हप्ता / टोकन रक्कम 4,00,000 /- रुपये आज देण्याचे ठरले.
*तडजोडी अंती लाच स्वीकारली:-* एकुण मागणी रकमेपैकी पहीला हप्ता / टोकन रक्कम 4,00,000/- रूपये (चार लाख रु.)
तक्रारदार हे शासकीय मान्यताप्राप्त व नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार आहेत. तक्रारदार यांना जिल्हा परीषद अंतर्गत अक्कलकुवा उपविभाग मार्फत भगदरी येथील गुरांच्या दवाखान्याची नवीन ईमारत बांधणे , रस्ता सुधारणा , रस्ता जलनिस्सारणाची कामे व ईतर 45 कामांचे कार्यारंभ आदेश मिळाले होते व नमुद सर्व कामे तक्रारदार यांनी पुर्ण केली आहेत. सदर कामांबाबत आलोसे यांनी तक्रारदार यांचे एकूण आठ कोटी पंचेचाळीस लाख एकोन्नवद हजार रुपये ( 8,45,89,000/- रुपये) अंतिम देयके मान्य केली असुन यापैकी एकुण सात कोटी एकसष्ट लाख एकोन्नवद हजार रुपये ( 7,61,89,000 /- रुपये) एवढी रक्कम तक्रारदार यांना प्राप्त झाली आहे. तसेच एकुण मान्य रकमेपैकी ऊर्वरीत 84 लाख ( 84,00,000 /- रुपये) एवढी रक्कम आलोसे यांनी राखून ठेऊन तक्रारदार यांना मुद्दामहुन अनामत रक्कम राखुन ठेवली असे सांगीतले. सदरची 84,00,000/- रुपये ऊर्वरीत रक्कम मिळणेकामी तक्रारदार यांनी वेळोवेळी जि.प. बांधकाम उपविभाग कार्यालय अक्कलकुवा येथे उप अभियंता सुनील पिंगळे व सहाय्यक अभियंता एस बी हिरे यांना भेटून ऊर्वरीत देयकाची रक्कम मिळणे कामी विचारणा केली असता त्यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी या आधी अदा केलेल्या देयकांबाबत च्या रकमेच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून उप अभियंता सुनील पिंगळे यांनी तीस लाख पन्नास हजार रुपये ( 30,50,000/- रुपये) व शाखा अभियंता एसबी हिरे यांनी तेरा लाख पंचवीस हजार रुपयांची ( 13,25,000/- रुपये) अशी एकुण त्रेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये ( 43,75,000/- रुपये ) एवढ्या रकमेची मागणी केली.
तसेच मागणी केलेली रक्कम/ पैसे दिले नाही तर तुमचे उर्वरित देयके तुम्हाला भेटू देणार नाही असे सांगीतले. तसेच तक्रारदार यांनी आलोसे यांना वरील नमुद रक्कम द्यावी याची हमी म्हणुन तक्रारदार यांचेकडून आलोसे यांनी जळगाव जनता सहकारी बँक शाखा नंदुरबार या बँकेचे 30 लाख 50 हजार रुपयांचा चेक/धनादेश व तेरा लाख 25 हजार रुपयांचा चेक/धनादेश असे दोन चेक/धनादेश दिनेश यादवराव सोनवणे या आलोसे यांच्या ओळखीच्या इसमाचे नावाने लाचे पोटी लिहून घेऊन त्यांचे ताब्यात ठेवले व रोख रक्कम आणून दिल्यानंतर सदरचे दोन्ही चेक/धनादेश परत करून देऊ असे सांगितले होते. 1) सुनील दिगंबर पिंगळे जि.प.बांधकाम उप अभियंता वर्ग -1 2) एस बी हिरे जि.प. बांधकाम सहाय्यक अभियंता वर्ग -2 दोन्ही नेमणुक जि.प. बांधकाम उपविभाग कार्यालय अक्कलकुवा , तालुका अक्कलकुवा, जि. नंदूरबार यांनी तक्रारदार यांच्याकडून 43,75,000/- रुपये (43 लाख 75 हजार) लाचेची मागणी करून तडजोडी अंती प्रथम हप्ता / टोकन रक्कम 4,00,000/- रुपये आज दि.23.03.2022 रोजी पंच साक्षीदारांसमोर लाचेची रक्कम स्वीकारली आहे. आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा मार्गदर्शक अधिकारी:
▪️मा. श्री. सुनील कडासने सो., पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▪️मा. श्री. नारायण न्याहाळदे सो., अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▪️मा. श्री. सतीश भामरे सो., पोलीस उपअधीक्षक (वाचक) ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
सापळा अधिकारी
पोलीस उप अधीक्षक, राकेश आ. चौधरी, ला.प्र.वि., नंदुरबार
सह सापळा अधिकारी:
▪️पोलीस निरीक्षक, समाधान महादू वाघ, ला.प्र.वि, नंदुरबार
▪️ पोलीस निरीक्षक, माधवी एस. वाघ, ला.प्र.वि. नंदुरबार
सापळा पथक
पोह/उत्तम महाजन, पोहवा/विलास पाटील, पोहवा/विजय ठाकरे, पोना/अमोल मराठे पोना/ संदीप नावाडेकर, पोना/ देवराम गावित, मपोना/ ज्योती पाटील व चापोना/ जितेंद्र महाले सर्व नेम. ला.प्र.वि., नंदुरबार.
याद्वारे सर्व नंदूरबार जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
नंदुरबार एसीबी कार्यालय फोन नं.:- 02564-230009