नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घोटी पोलिस स्टेशनमधील पोलिस नाईक रविराज जगताप याला १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली आहे. याप्रकरणी जगताप विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. तसेच, त्याची कसून चौकशी सुरू आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, घोटी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी आणि यापूर्वी करण्यात आलेल्या सहकार्याच्या बदल्यात जगताप याने १० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर एसीबीकडे याची तक्रार करण्यात आली. एसीबीने याची दखल घेत सापळा रचला. अखेर एसीबीच्या सापळ्यात जगताप हा रंगेहाथ सापडला आहे. आता त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Anti Corruption Bribe Ghoti Police ACB Raid