धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सेवानिवृत्तीच्या दिवशीही लाच घेणारा भामटा गटविकास अधिकारी जाळ्यात सापडला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रचलेल्या सापळ्यात शिरपूर पंचायत समितीचा गटविकास अधिकारी वाय डी शिंदे हे पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. विशेष म्हणजे, शिंदे हा आज सेवानिवृत्त होणार होता. तसेच, त्याचा सेवानिवृत्ती समारंभ उद्या (१ एप्रिल) होणार होता. तसेच, निमंत्रण त्याने सर्वांना पाठवले होते. मात्र, पैशांचा हव्यास त्याला नडला आहे. शिंदे याच्या सांगण्यावरुन पंचायत समितीचा लेखा अधिकारी चुनीलाल देवरे याने लाचेची रक्कम पाच हजार रुपये स्विकारले. शिक्षकाची सेवानिवृत्तीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ही लाच मागण्यात आली. एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.