नाशिक – शिंदे गावातील मंडळ अधिकारी प्रशांत भास्कर घोडके यांना १० हजार रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात ते बिटको महाविद्यालयाच्या पोलीस चौकीसमोर लाच घेतांना सापडले.
मौजे जाकोरी येथील गट क्रं. ५४२/ २ येथील जमीनीचा केलेला ई टीएस मोजणीच्या प्रतीसाठी व तक्रारदार विरुध्द होणा-या दंडात्मक कारवाईत त्यांना मदत करण्यासाठी तक्रारदार यांचेकडून १० हजार रुपयांची लाचेची मागणी घोडके यांनी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. .त्यानंतर सदर तक्रारीची पडताळणी करुन लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचला. या सापळ्यात मंडळ अधिकारी सापडले. या लाच प्रकरणी उपनगर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ (सुधारीत सन -२०२८) चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.