बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारतातील अग्रगण्य कृषीथॉन प्रदर्शनाच्या तारखा जाहीर

by India Darpan
जुलै 5, 2022 | 7:01 pm
in स्थानिक बातम्या
0
Krishithon Logo

नाशिक – गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ब्रेक घेतलेल्या भारतातील अग्रगण्य कृषीथॉन प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यंदा कृषीथॉन नव्या दमाने २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान एबीबी सर्कलजवळील ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचे माहितीपर स्टॉल्स, जाणकारांशी भेटी, चर्चासत्राच्या माध्यमातून समस्यांचे निराकारण, कृषी पिकांची मार्केटिंग, प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव करणारे अभिनव व्यासपीठ म्हणून नाशिक येथे आयोजित होणारे कृषीथॉन भारतातील अग्रगण्य प्रदर्शन म्हणून ओळखले जाते.

विविध कृषी उत्पादने आणि प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे नाशिक जिल्ह्याला देशात लौकिक प्राप्त झाला आहे. अशा या कृषिवलांना कृषी क्षेत्रातील नवनवीन घडामोडींची माहिती करून देण्यासाठी १९९८ पासून कृषीथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. या शृंखलेतील १५ व्या कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू झाली असून, आंतरराष्ट्रीय पातळीच्या उद्योगांची कृषी उत्पादनांना व नवनवीन संशोधन करणाऱ्या संस्थांना सहभागासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. तसेच शेतकरी व कृषी व्यवसायाशी निगडित संस्थांना भेट देऊन त्यांच्या गरजांची माहितीचे संकलन सुरू झाले आहे. दोन वर्षांपासून प्रदर्शन झाले नसल्यामुळे यंदा सहभागी संस्था आणि शेतकरी या दोघांत उत्साह दिसत आहे, असे सहआयोजक साहिल न्याहारकर यांनी सांगितले.

या वर्षी प्रदर्शनात कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या राज्य, देश आणि परदेशातील नामांकित ३०० हून अधिक कंपन्या व संस्था सहभागी होणार आहेत. दरवर्षी जवळपास दीड लाखांहून अधिक शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात. कृषी निविष्ठा उत्पादक, बियाणे, कृषी अवजारे, ट्रॅक्‍टर, ठिबक व तुषार सिंचन, फवारणी यंत्रे उत्पादक कंपन्या, बँका, विमा कंपन्या, कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, विविध कृषिपूरक उद्योग, रोपवाटिका,

अन्नप्रक्रिया उद्योग तसेच कृषीविषयक शासकीय विभागांचा प्रदर्शनात सहभाग असेल. ‘कृषीथॉन मार्फत शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी, संवाद साधण्यासाठी एक पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी www.krishithon.com या संकेतस्थळावर किंवा ९८२२८४२२६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांतून नाशिक तालुक्यातील ७७ गावे झाली प्रकाशमय

Next Post

त्या’ वाहनांचा होणार १३ जुलै जाहिर ई-लिलाव

Next Post
rto

त्या' वाहनांचा होणार १३ जुलै जाहिर ई-लिलाव

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011