बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची मर्यादा आता १५ लाख रुपये

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 20, 2022 | 4:35 pm
in संमिश्र वार्ता
0
DSC02879 e1666263823548

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाखावरून १५ लाख करण्यात आल्याची माहिती या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते. वैयक्तिक कर्ज परतावा योजनेंतर्गत वयोमर्यादेची अट ६० पर्यंत वाढविण्यात आल्याची माहितीही श्री.पाटील यांनी दिली.

श्री.पाटील म्हणाले की, महामंडळाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच पहिल्या दिवशी राज्यातील ३ हजार ७२७ लाभार्थ्यांना २ कोटी ९७ लाख एवढा व्याज परतावा वितरीत केला आहे. महामंडळातर्फे व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाख होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मर्यादा १५ लाख रु. पर्यंत वाढविली आहे. त्याचबरोबर सीसी आणि ओडी कर्जांतर्गतचा व्याज परतावा पुन्हा सुरु करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महामंडळाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जांना राज्य सरकारतर्फे हमी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्या-आल्या ही हमी पुन्हा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा मराठा समाजातील तरुणांना मोठा फायदा होणार आहे. असेही श्री.पाटील यांनी नमूद केले. महामंडळाच्या कर्ज योजनातून एक लाख मराठा उद्योजक तयार करू असे सांगून श्री.पाटील म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यानंतर मराठा समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. सारथी आणि महाज्योती महामंडळांच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शंभर विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक येथे मुलींचे वसतिगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Annasaheb Patil 15 Lakh Limit Narendra Patil

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य सरकारचे दिवाळी गिफ्ट! मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय

Next Post

निफाडमध्ये बंगल्यासमोर लावलेली क्रेटा कार चोरणारे सीसीटीव्हीत कैद (व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
20221020 173537

निफाडमध्ये बंगल्यासमोर लावलेली क्रेटा कार चोरणारे सीसीटीव्हीत कैद (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
IMG 20250708 WA0417 1

एमएमसीअंतर्गत होमिओपॅथिक डॉक्‍टरांच्‍या नोंदणीला विरोध…आयएमए नाशिकतर्फे जिल्‍हाधिकार्यांना निवेदन

जुलै 8, 2025
solar e1703396140989

मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग…विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011