सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड जवळ असलेल्या अंकाई किल्यावर मुसळधार पावसाने धबधबे वाहू लागले आहे. मराठवाड्याचे प्रवेशव्दार म्हणून ओळखल्या जाणा-या या प्रसिद्ध अंकाई-टंकाई परिसरात गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे येथील धबधबे आता प्रवाहीत झाले असून ते बघण्यासाठी आता नागरिकही मोठ्या संख्येने गर्दी करत आहे.