सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाडपासून जवळ असलेल्या अंकाई किल्ल्यावर अगस्ती मुनींचे स्थान असून या ठिकाणी ऋषिपंचमी निमित्त भाविकांनी किल्ल्यावरील तळ्यात अंघोळीसाठी मोठी गर्दी केली. श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे अगस्ती मुनींच्या दर्शनासाठी गर्दी होते. तशीच गर्दी आज ऋषीपंचमी निमित्त झाली. काही दिवसांपूर्वी याच तळ्यात अंघोळ करताना दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तळ्यावर दोर बांधले, सुचना फलक सुद्धा लावले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत भाविकांनी तळ्यावर अंघोळीसाठी गर्दी केली होती.