इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन हे धुरवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत. केज :- हे फोटो तपासा आणि आधी खात्री करा. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे अशी पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
त्यात त्यांनी पण कोणाबरोबर ? असा प्रश्न करुन म्हटले आहे की, संतोष देशमुख हत्याकांडाची सूनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिस सुधिर भाजीपाले यांच्या सोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत. आता यांचे जर आरोपीला वाचणारे हे निंलबित आधिकारी यांच्या सोबत केस चालू असताना, जज होळी खेळत असतील तर हे खूप चुकीचे आहे.