इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आत्ता फडणवीस दिल्लीत म्हणाले की अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य आणि अजित पवार म्हणाले जो निर्णय मुख्यमंत्री घेतील तो मान्य. मतितार्थ असा, की ह्या दोघांची आता खात्री पटली आहे की निर्णय घ्यायला हवा. पण कोण घेणार हे ठरत नाही. बस करा ही टोलवाटोलवी. आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दोन्ही नेत्यांवर टीका करत राजीनाम्याची मागणी केली.
काही दिवसांपूर्वीच अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळेस सर्व पुरावे त्यांनी धनजंय मुंडे विरोधात दिले होते. त्यानंतर आज अजित पवार हे बीडमध्ये पालकमंत्री म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली. त्यात धनजंय मुंडेही उपस्थितीत होते. या बैठकीनंतर पुन्हा धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय चर्चेला आला.
अजित पवार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे हा विषय टोलवला. तर मुख्यमंत्री यांनी अजित पवार यांच्याकडे त्यामुळे अंजली दमानिया यांनी या दोन्ही नेत्यांवर टीका केली आहे.