इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
धनंजय मुंडेंना कृषी घोटाळ्यात न्यायालाकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात वापसीची चर्चा सुरु झाली. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुध्दा त्याबाबत संकेत दिले. त्यानंतर त्यावरुन राजकीय प्रतिक्रियाही उमटले. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही मुद्दे उपस्थित केले असून त्याची चर्चा सुरु आहे.
अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंना परत घेण्याच्या चर्चेवर, अजित पवारांना माझे उत्तर. त्यानंतर त्यांनी दोन दोन मुद्दे उपस्थित केले आहे. धनंजय मुंडेंना कृषी घोटाळ्यात मिळालेली क्लीन चिट ही तुम्हाला सिंचन घोटाळ्यात मिळालेल्या क्लीन चिट इतकीच साफ खोटी आहे. भ्रष्टाचाराची चौकशीची झाली नाही. सरकार ने तुम्हाला पाठीशी घातले आणि त्यांच्या बाबतीत देखील तेच. सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाची पूर्ण दिशाभूल केली.
मुंडेंचा राजीनामा हा संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या फोटोंमुळे झाला, कृषी घोटाळ्याच्या आरोपाखाली नाही अशा माणसाला पुन्हा मंत्रिमंडळात कदापी सहन करणार नाही असे दमानिया यांनी म्हटले आहे.