इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड पाठवा आंदोलन जाहीर केले आहे. त्यांनी पोस्टकार्डमध्ये येत्या ८ दिवसात महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने, मुख्यमंत्र्यांना ‘पोस्टकार्ड’ लिहायचे असल्याचे आवाहन केले आहे. त्यात माणिकराव कोकाटे आम्हाला कृषी मंत्री म्हणून मान्य नाही’ असे सुरुवातीला म्हटले आहे.
दमानिया यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, वाचवा महाराष्ट्राला ह्या आंदोलनाची आपण घोषणा करूया. महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे की जर;हे किळसवाणी व घाणीचे राजकारण, ही गुंडगिरी, ही लूट, हा अमाप भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर या आंदोलनात सहभागी व्हावे.
लोकशाही मध्ये, कोण मंत्री राहणार आणि कोणाला घरी पाठवायचे हे जनता ठरवणार.
आंदोलन नंबर १:
येत्या ८ दिवसात महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने, मुख्यमंत्र्यांना ‘पोस्टकार्ड’ लिहायचे आहे. माणिकराव कोकाटे आम्हाला कृषी मंत्री म्हणून मान्य नाही’…. पत्राचा मजकूर उधारणास्तव मी खाली फोटो मधे देत आहे.
आंदोलन नंबर २:
प्रत्येक सामान्य माणसाने एक पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या किळसवाणी राजकारणाचा निषेध करणारे पोस्टकार्ड पाठवायचे आहे. त्याचा मजकूर उधारणास्तव खाली पाठवत आहे. लाखोंच्या संख्येने आपण अशी पोस्टकार्ड पाठवू आणि ह्या सरकारला लोकांची ताकत दाखवून देऊ. जर अपेक्षित कारवाई झाली नाही, तर १५ ऑगस्टला जनता रस्त्यावर येईल असा इशारा आपण या सरकारला देऊ असे म्हटले आहे.
आता या आंदोलनाचा काय परिणाम होतो ते काही दिवसात पुढे येईल.