इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यामुळे चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. या व्हिडीओत एका पैशाने भरलेली बॅग दिसत आहे. दरम्यान शिरसाट यांनी बँक पैशांनी भरलेली नाही. तिच्यात कपडे आहेत असा दावा केला आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला संजय शिरसाटांची कमाल वाटते.
दमानिया यांनी पुढे म्हटले की, बॅग मध्ये चक्क पैसे दिसत असतांना, ते पैसे नाही, कपडे असतील असे शिरसाट म्हणूच कसे शकतात? मी त्या विडिओला झूम करून फोटो काढला आहे. “हा माझ्या घरच्या वीडियो आहे “ असे ते म्हणत आहेत… त्यांच्यात हिम्मत असेल आणि ते खरं बोलत असतील तर आजच्या आज त्यांनी त्यांच्या घरी माध्यमांना नेऊन दाखवावे की जी रूम वीडियो मधे दिसत आहे ती खरच त्यांच्या घरची आहे मला ह्यात फक्त एक गोष्ट चुकीची वाटते की कोणाच्याही बेडरूम मध्ये CCTV लावणे अतिशय चुकीचे आहे.
खा. राऊत यांची टीका.
खा. राऊत यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते! स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहात बसणार आहेत? हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस! असे म्हणत टीका केली आहे. तर दुसरी एक पोस्ट त्यांनी हिेदीत केली असून त्यात म्हटले आहे की, इस रोमांचक vedio को आदरणीय प्रधान मंत्री नरेंद्र मोदी और गृहमंत्री अमित शहा भाई ने देखना चाहिये! देश मे ये क्या चल रहा है!
(महाराष्ट्र के एक मंत्री का ये vedio बहोत कुछ कहेलाता है)
मंत्री शिरसाट यांचे स्पष्टीकरण
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, व्हिडिओत जे दिसतंय ती माझी बेडरुम आहे. मी बनियनवर बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा आहे. तिथे एक बँग ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होती की मी कुठूनही प्रवास करुन आलो आहे. मी कपडे काढले आहेत. मी बेडवर बसलो आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, एवढे सारे पैसे मी बँगमध्ये कसे ठेवेन, घरातील आलमा-या मेल्या आहेत का.