इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीड हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने या घटनेचा पाठपुरावा करुन नवीन नवीन माहिती जनतेसमोर आणत आहे. आज त्यानी काही कागदपत्र CJ मुंबई हाई कोर्ट आणि DG रश्मी शुक्ला यांना दिले आहेत. ते Office of profit चे आहेत. याचा योग्य तपास झाला तर यात मंत्रिपद काय धनंजय मुंडे ह्यांची आमदारकी देखील जाईल असे त्यांनी सांगितले आहे.
दिलेल्या कागदरपत्र कमीत कमी ४० आहे. त्यात माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारची पोस्टही त्यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. त्याचबरोबर त्यांनी वाल्मिक कराडवर अनेक गंभीर आरोप केले आहे.