इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीड प्रकरणात ९ तारखेला काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून २ मोबाईल मिळाले होते. त्यात एका बड्या नेत्याचा फ़ोन आला होता अशी बातमी माध्यमांनी दाखवली होती. तो मोबाईल डेटा रिट्रीव करण्यासाठी फॉरेंसिक मध्ये पाठवण्यात आला होता, आता २ महिने झाले. कधी मिळणार तो डेटा ? कधी कळणार त्या नेत्यांचे नाव? आणि त्यांना वाचण्यासाठी कराड सुद्धा सुटणार अशी भीती वाटते असे ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, दुसरं म्हणजे १९ जुनला सातपुडा या शासकीय बंगल्यात आवदा कंपनी बरोबर ३ कोटीचा व्यवहार झाला असे धस म्हणाले होते, मग त्यात पुढे काय चौकशी झाली? काय स्टेटमेंट घेतली? अवादा च्या कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट घेतली का? मग धनंजय मुंडे यांच्यावर का गुन्हा झाला नाही?
तर दुस-या ट्विट मध्ये म्हटले आहे की, सामान्य लोकांना (देशमुख कुटुंबाला) खरंच न्याय मिळेल का? आज तरी राजीनामा होणार का ? आज स्व संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून एक detailed पत्र, ज्या मधे, धनंजय मुंडे यांच्या वरचे सगळे आरोप, मी पुरव्या सकट, मी मुख्यमंत्री, लोकायुक्त,अजित पवार, इलेक्शन कमिशन, CBI, CAG आणि ACB ला पाठवत आहे.
ह्यांचा पाठिंबा जर वाल्मिक कराडला नसता, तर ही क्रूर हत्या झाली नसती. आज तरी ते चौकशी लावतील आणि राजीनामा घेतील अशी अपेक्षा. अजून बरेच काही कळणे बाकी आहे…..अजून त्या स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या फ़ोन चा डेटा देखील रिट्रीव झालेला नाही. अजून का झाला नाही ?तो बडा नेता कोण आहे, अजून का कळले नाही?जो पर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहे, तो पर्यंत दबाव राहणार. त्यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे.