इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला. त्यानंतर बुधवारी बीड जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने ७ दिवसाची एसआयटी कोठडी दिली. त्यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढल्या आहे.
तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत गंभीर आरोप केले आहे. त्यात म्हटले आहे की,
मुंडे. (आपल्या कष्टाच्या कराच्या पैशातून एका गुन्हेगाराचे संरक्षण ? ), १५ तारखेला SP ना सांगून अंगरक्षक recall करवून, वाल्मिक कराड ला पळून जाण्याची संधी उपलब्ध अरुण देणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे, खून, जीवे मारण्याची धमकी, खंडणी असे ५० च्या वर सेक्शन्स असलेल्या माणसाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे परळीचे अध्यक्ष करणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे ….वाल्मिक कराड ला पदोपदी वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे…..संतोष देशमुख यांची हत्या व खंडणी या दोन वेगवेगळ्या केस बनवण्यासाठी राजकीय दबाव आणणारे मंत्री धनंजय मुंडे….
तपास न होऊ देणे, कराडच्या जवळच्या अधिकाऱ्यांची SIT बनवणे, सगळं सगळं करुन चुकणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे….ह्या धनंजय मुंडेंचा जो पर्यंत राजीनामा होणार नाही, तो पर्यंत लढत राहिला हवं
https://twitter.com/anjali_damania/status/1879561204773073380