इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? अशी पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून ती चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद सांगत होते.
४ दिवसांपूर्वी PC घेऊन भाजपला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले, दाल मे कूछ काला है. ते पत्रकार मला म्हणाले की भाजप चीच रणनीती असेल की ह्यांना विरोधी पक्षात बसवावे, त्यांना हवे नको ते सगळे पुरवले जाईल आणि विरोधी पक्ष नेता पण ह्यांचाच . बाकी सगळे साफ .
तसेच होतांना दिसतंय शिंदे विरोधी पक्षात ? विरोधी पक्षच संपवण्याचा हा भाजपचाच का कट सत्ता पण आमचीच आणि विरोधी पक्ष पण आमचाच. बाकी पक्ष / विरोधी पक्ष नेतातच अस्तित्वात ठेवायचे नाहीत. गावी जाणे, ताप येणे, पुन्हा घरी येणे, पुन्हा बरं न वाटणे ही भाजप ची script
या पोस्टवर कनिष्क जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्यात म्हटले आहे की, भाजपची ही स्क्रिप्ट तर भयंकरच दिसते आहे.२०१४ पासून सगळे विरोधी पक्षनेते भाजपने आपल्या कळपात खेचून नेले परंतु मग यावेळी तर विरोधी पक्षनेता स्वतः भाजपच नेमत आहे. लोकशाहीचे अवमूल्यन यापेक्षा काय वेगळे असणार? असा प्रश्नही केला आहे.