मुंबई – महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेणार असल्याचे ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना Session’s court कडून महाराष्ट्र सदन केस मधून डिस्चार्ज मिळाला आहे. ह्या डिस्चार्ज ला मी हाय कोर्टात चॅलेंज करणार आहे. तर दुस-या ट्विट मध्ये त्यांनी पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि इतरांनी, तळोजाच्या एका केस मध्ये दाखल केलेले discharge petition कोर्टाने allow केले. पण सरकारी वकील गैरहजर होते ? का ? मग केसची बाजू कोण मांडणार ? सगळ्या केसेस अशा एक एक डिस्चार्ज मिळत जाणार ?
https://twitter.com/anjali_damania/status/1435869481088131073?s=20
https://twitter.com/anjali_damania/status/1435826264833609731?s=20