इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्र्यावर आरोप होत असतांना त्यांनी आता सारवासारव सुरु केली आहे. त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दोन पोस्ट केल्या असून त्यातून या मंत्री माणिकराव कोकाटे व कदम यांचा समाचार घेतला आहे.
त्यांनी पहिल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोकाटे आधी म्हणाले…..मी पत्ते खेळत नव्हतो. मी काहीतरी पाहात होतो आणि काही सेकंदांची त्या पत्याच्या खेळाची जाहिरात आली. सिद्ध झालं की तब्बल २२ मिनिटं पत्ते खेळत होते. काय झालं….फक्त बदली.
कदम आधी म्हणाले…..डांस बार नाही ऑर्केस्ट्रा होता आणि तो मी नव्हेच…. (आमचा नाही) सिद्ध झालं की परवाना त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीचा होता आणि पकडलं गेल्यावर रद्द करण्याचे पत्र देतात…. आता पुन्हा दरेकर म्हणतील राजकारण करू नका आणि समाधान माना.
तर दुस-या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बार आमचा नाही…..परवाना आमचा नाही….डांस बार नाही ऑर्केस्ट्रा ‘ आहे …..आम्ही चालवायला दिला आहे …..आणि आता थेट बार रद्द करण्याचे पत्र स्वतः देतात ? काय खरं आणि काय खोटं? चोरी पकडली म्हणून हे पत्र, नसती पकडली, तर पत्र पाठवलं असतं का? सूत्र म्हणतात ३५ वर्ष हा बार होता, २०२३ मधे तीनदा रेड झाली…. तेव्हा का रद्द केलं नाही? तेव्हा का पत्र लिहिले नाही?