इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र सरकारच्या मित्रा संस्थेच्या मानद सल्लागारपदी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची नियुक्ती झाली आहे. इन्स्टिट्यूट फॅार ट्रान्सफॅार्मेशन या सरकारी संस्थेवर नियुक्ती झाल्यानतंर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी खोटक टोला लागवलाय.
त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते याची प्रचिती परत आली.यावेळी एका स्वयंघोषीत समाजसेविकेने आपल्या पतीला केवळ दुसऱ्यांवर आरोप आगपाखड करण्याच्या निकषावर चक्क शासनाच्या सल्लागारपदी आणुन ठेवले आहे.
तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र सरकारची think tank असलेल्या मित्रा (MITRA) च्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन..! एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून अंजली दमानिया ताई ‘सामाजिक’ क्षेत्रात योगदान देत आहेत आता अनिश जी यांचे ‘आर्थिक विकासाच्या’ क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे. दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातले #combination निश्चितच महत्वपूर्ण राहील. पुनश्च एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा..!