नाशिक – अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक शाखेतर्फे बुधवार (दि. १) डिसेंबर रोजी गंगापूर रोड येथील कुसुमाग्रज स्मारकात सायंकाळी ६ वाजता “ज्योतिष: किती खरे, किती खोटे?’ या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीचे अकोला येथील सदस्य शरद वानखेडे हे ज्योतिष या विषयावर आपले विचार मांडतील.
नाशिकमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानी विज्ञानकथा लेखक जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. जयंत नारळीकर यांनीही ज्योतिषशास्त्र हे विज्ञान असू शकत नाही आणि ते विद्यापीठांमध्ये शिकवता कामा नये, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांच्या मते ज्योतिष हे शास्त्र नाही. तरीही मग एवढे ज्योतिषी कसे? त्यामुळे ज्योतिष: किती खरे? किती खोटे?’ याविषयावर या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य शरद वानखेडे आपले परखड विचार मांडणार आहे. ज्योतिषातील सत्य जाणून घेण्यासाठी सर्वांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्यावतीने अनुप खैरनार यांनी केले आहे.