बुधवार, जुलै 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

by Gautam Sancheti
जून 20, 2025 | 10:50 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– एकीकडे शिवसेना ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु असतांना निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी ठाकरे कुटुंबियांवरील आपली निष्ठा व्यक्त करत भावनिक संदेश सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. काल शिवसेनेचा वर्धापनदिन होता. त्या पार्श्वभूीवर त्यांनी हा संदेश पोस्ट केला आहे.

कदम यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायत सदस्य ते विधानसभा सदस्य हा माझा प्रवास शिवसेनेमुळेच आहे. अनिल कदम हा ब्रँड झाला तो केवळ शिवसेना, ठाकरे कुटुंबिय आणि तमाम शिवसैनिकांमुळेच! मी बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांपुढे सदैव नतमस्तक असेल.शिवसेना – एक विचार, एक संस्कार, एक जीवनमार्ग आहे.

लहानपणापासून माझ्या अंतःकरणात खोलवर रुजलेलं नाव म्हणजे शिवसेना. हा केवळ पक्ष नाही, ही आहे मराठी अस्मितेची चळवळ, हिंदुत्वाचा अभिमान,
आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा एक ज्वलंत अध्याय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तेजस्वी नेतृत्व, त्यांची प्रखर वक्तृत्वशैली,
त्यांनी घडवलेला कार्यकर्ता, आणि त्यांचा महाराष्ट्रभर ते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि जगभरातील मराठी मनांवर उमटलेला प्रभाव — हे सगळं आजही जिवंत आहे.

५९ वर्षांचा प्रवास हा नुसता वेळ नाही, तर तो आहे लाखो शिवसैनिकांच्या घामाचा, त्यागाचा, निष्ठेचा आणि अभिमानाचा दस्तऐवज. आज शिवसेनेवर जे अघटित झाले, ते दुःखद आणि असह्य आहे. ही फक्त फाटाफुटी नाही,तर एका वैभवशाली विचारधारेवर झालेला आघात आहे. काय झालं, कुणी केलं, का केलं – हे प्रश्न आजही अनेक मनात खदखदत आहेत.

पण मी एक सांगतो –शिवसेना ही केवळ संघटना नव्हती, ती आमचं आयुष्य होती. आणि बाळासाहेब हे केवळ नेते नव्हते, ते आमचे देव होते.

आज मी जे काही आहे –ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद सदस्य, सभापती आणि दोन वेळा आमदार (MLA) या सगळ्या पदांवर मी पोहोचलो,
ते केवळ आणि केवळ शिवसेनेमुळे, बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आणि उद्धवसाहेब ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांच्या आशीर्वादामुळेच.

आज माझं नाव अनिल कदम जर कुठे “ब्रँड” म्हणून ओळखलं जात असेल, तर तो सारा मान मी बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांना देतो.
मी मनापासून नतमस्तक होतो उद्धवसाहेब ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांपुढे. निफाड तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिक, मतदार आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मी मनःपूर्वक आभार मानतो. आजही माझ्या मनात फक्त आणि फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे, आणि तोच माझा श्वास आहे,माझं बळ आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

Next Post

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

ताज्या बातम्या

Gwd7s8ObwAAqGCx

माणिकराव कोकाटे आम्हाला कृषी मंत्री म्हणून मान्य नाही…अंजली दमानिया यांचे पोस्ट कार्ड आंदोलन

जुलै 23, 2025
Court Justice Legal 1

विशेष लेख….निरपराधांचा बळी, आरोपी निर्दोष

जुलै 23, 2025
Kia Carens Clavis EV

किया इंडियाची ४९० किमी रेंज देणारी पहिली मेड फॉर इंडिया ७-सीटर ईव्‍ही …बुकिंगला सुरुवात

जुलै 23, 2025
jail11

कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण करणारा आरोपी गजाआड…मनसैनिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

जुलै 23, 2025
रोजगार मेळाव्यांनी साजरा झाला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस 2

राज्यात विक्रमी १०२ रोजगार मेळावे, ५७ हजार नोंदणी, २७ हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार

जुलै 23, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मदतीसाठी संकोच करू नये, जाणून घ्या, बुधवार, २३ जुलैचे राशिभविष्य

जुलै 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011