इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ओझर: महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल साहेबराव कदम यांचा ओझर येथे ठिकठिकाणी प्रचार सभा संपन्न झाल्या असून ओझरकर नागरिकांनी त्यांचे पुष्पवृष्टी करत फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केली.नागरिकांनी मोठ्या संख्येने कॉर्नर सभांना हजेरी लावत भूमिपुत्र म्हणून अनिल कदम यांच्या प्रती आपला पाठिंबा दर्शविला.
ओझर नगरपरिषद,नागेश्वर चौक, मिलिंद नगर राजवाडा, टाउनशिप येथे झालेल्या सभांना मतदारांनी लक्षणीय उपस्थिती लावत आपला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी अनिल कदम यांनी बोलताना आपले येणारे व्हिजन हे बेरोजगारी नष्ट करणारे अन् शेतकऱ्यांसाठी हमीभाव देणारे असेल असे नमूद केले. महायुती सरकारने सर्वसामान्य लोकांना वाऱ्यावर सोडत उद्योगपतींना केंद्रबिंदू ठेवले.
निफाड तालुक्यात आजही आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून आजही सर्वसामान्य गोरगरीब जनतेला सार्वजनिक सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.आताच्या सरकारने सामान्य माणसांचा हक्क हिरावून घेत त्यांचा अपेक्षाभंग केला यामुळे जनतेने ही निवडणूक हातात घेतली असून निफाड तालुक्यावर महाविकास आघाडीचा भगवा फडकणार असल्याचा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.यावेळी ओझरकर नागरिकांनी अनिल कदम यांचे फटाक्यांच्या आतिषबाजी करत ढोल ताशा वाजवत स्वागत केले. यावेळी मेनरोड, शिवाजीरोड नागेश्वर चौक,तानाजी चौक दरम्यान महिलांनी औक्षण करत विजयी भव:च्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी संपर्कप्रमुख बापूसाहेब जाधव,प्रकाश महाले,कामेश शिंदे, कुंदन कदम, संजय गवळी,नितीन काळे,विशाल मालसाने,दीपक जाधव,सुनील बाफना,गौरव कर्पे, चिंधू कदम,वैभव कदम,धनेश कदम,अनिल सोमासे, अमित कोळपकर,राजेश देशमुख,संदेश जाजू,रामदास कर्पे,रमेश देशमुख,दीपक सोनार, रमेश उगले,प्रशांत कर्पे, पप्पू कदम, गोपाल लढ्ढा, नारायण अक्कर, विकी ताडे आदींसह शिवसैनिक व महाविकास आघाडीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/reel/2578367979029990