विशेष प्रतिनिधी, मुंबई
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी देशमुख यांना अटकेपासून हंगामी संरक्षण द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सीबीआयनं अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली हा गुन्हा नोंदवला आहे. तो रद्द करावा यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आज त्याची सुनावणी करताना न्यायालयानं त्यावर सीबीआयकडून जाब मागितला आणि सुनावणी उन्हाळी सुट्टी संपेपर्यंत तहकूब केली. हंगामी संरक्षणाचा आदेश द्यायला न्यायालयानं नकार दिला. मात्र अगदीच तातडी असेल तर त्यासाठी देशमुख सुट्टीकालीन पीठाकडे जाऊ शकतात, असे न्यायालयाने सांगितले.