नागपूर – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासह अन्य मालमत्तांवर केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने आज छापे टाकले. तसेच, देशमुख यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्यातील राजकीय घडामोडींनीही वेग घेतला आहे. आता देशमुख यांनीही याप्रकरणी आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. यासंदर्भात माध्यमांनी देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले की, सीबीआयचे पथक आमच्या घरी आले. त्यांना आम्ही सर्वतोपरी सहकार्य केले. तसेच, त्यांना आवश्यक ती सर्व माहिती दिली आहे. नागपूरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे काटोल येथे काही कोविड सेंटरला भेट देण्यासाठी मी जात असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1385969364004859909