मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांच्या घरी आणि मालमत्तांच्या ठिकाणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने छापे टाकले आहेत. याप्रकरणी देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत प्रतिक्रीया दिली आहे. केंद्र सरकार कोरोना संकटातील अपयश लपविण्यासाठीच सीबीआय छाप्यांचा उद्योग केला जात असल्याचे पक्षाने म्हटले आहे. तर, पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, सीबीआयने न्यायालयाला प्राथमिक अहवाल दिला नसून या छापेमारीचा आम्ही निषेध करीत आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत प्रतिक्रीया
साधा प्राणवायू पुरवण्यात केंद्र सरकारला अपयश आलंय. देशभर ऑक्सिजनअभावी रुग्ण मृत्यूच्या दारात आहेत. राजधानीत २४ तासांत ३० रुग्णांचा मृत्यू झाला. ना ऑक्सिजन, ना रेमडिसिवीर ना लस. हे अपयश झाकत माध्यमांचं लक्ष विचलित करण्याची केंद्र सरकारची ही जुनीच #CBI खेळी.
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 24, 2021
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रीया
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री श्री. @AnilDeshmukhNCP यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला व सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण ४ जणांची चौकशी झाली, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. मा.उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’चे आदेश दिलेले होते.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 24, 2021
या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्याप पर्यंत ऐकिवात नाही. परंतु ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 24, 2021
या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 24, 2021