मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता देशमुखातर्फे न्यायालयात एक दोन दिवसासाठी जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. हा अर्ज करतांना आरोग्याचे कारण देशमुखतर्फे देण्याची शक्यता आहे. शनिवारी देशमुख यांची ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना आज पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयात ईडीच्या वतीने जोरदार युक्तिवाद करुन पुन्ही ईडी कोठडीची मागणी केली. तर देशमुख यांच्या वकिलांनीही जामीन मिळावा यासाठी युक्तिवाद केला. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून देशमुख यांना १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.