विशेष प्रतिनिधी, मुंबई :
महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काही महिन्यापूर्वी प्रचंड आरोप झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर विरोधकांनी याविरुद्ध आवाज उठवत देशमुख यांनी राजीनामे द्यावा, तसेच सीबीआयमार्फत चौकशी करावी. अशी मागणी केली होती. या प्रकरणी चौकशी सुरु झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला व त्यानंतर देशमुख यांच्या संपत्तीवर टाच आणली होती. त्यामुळे वारंवार चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या देशमुख यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत होती. परंतु आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयच्या प्राथमिक तपासात क्लिनचिट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पण, हा अहवाल अधिकृतरित्या समोर न आल्यामुळे त्याबाबत प्रश्नही निर्माण केले जात आहे.
सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या या अहवालात, १०० कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपातून त्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाली आहे. हा अहवााल ६५ पानीआहे. तसेच उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांनी हा अहवाल सादर केला. हा अहवाल खरा असेल तर फेऱ्यात अडकलेल्या देशमुखांसाठी हा मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या अहवालात देशमुख यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून कथित आरोप केले होते. दरम्यान, ठाकरे सरकारने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील दोन मुद्दे रद्द करावेत, या मागणीसाठी राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, सदर याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली.