विशेष प्रतिनिधी मुंबई
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपन्यांच्या समुहाकडे सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जात आहे. रिलायन्स समुहातील काही कंपन्यांनी शेअर बाजारात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे कर्जाचे ओझे आणि बँकांच्या कारवाईमुळे दबलेल्या अनिल अंबानी यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स कॅपिटल या कंपन्यांच्या शेअर्सनी चांगलीच उसळी घेतली आहे. या कंपन्यांच्या शेअर्सद्वारे गुंतवणूकदारांनी चांगलेच पैसे कमावले आहेत. वीस सत्रांमध्ये तिन्ही कंपन्यांच्या ५० लाख समभागदारांचा मोठा फायदा झाला आहे. तिन्ही कंपन्यांचे भांडवली मूल्य आठ हजार कोटींपेक्षा अधिक वाढले आहे.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या समभागाची किंमत १०५.२० रुपये होती. या महिन्यात कंपनीचे शेअर्स २७ टक्के, गेल्या महिन्यात १०४ टक्के आणि गेल्या तीन महिन्यात २२५ टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. रिलायन्स पॉवरचा शेअर भाव १५.८५ रुपये होता. कंपनीची मार्केट कॅप ४४४६ इतकी आहे. या समभागाने गुंतवणूकदारांना एका महिन्यात २६.८० टक्के, एका महिन्यात १३० टक्के आणि तीन महिन्यात २४९ टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत.
रिलायन्स कॅपिटलच्या समभागाची या आठवड्यात २५.८५ रुपये इतकी किंमत होती. या महिन्याभरात गुंतवणूकदारांना २७ टक्के, महिनाभरात १२५ टक्के आणि तीन महिन्यात १३१ टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत.