इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ईडीनंतर आता सीबीआयने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या सहा ठिकाणांवर छापे टाकले. याआधी कर्ज घोटाळाप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी छापे टाकले होते. त्यानंतर आज सीबीआयने अनिल अंबानी यांच्या जवळपास सहा ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयने ज्यावेळी छापे टाकण्यास सुरुवात केली त्यावेळी अनिल अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य निवासस्थानी उपस्थित होते.
स्टेट बँकेकडून कर्ज घेऊन २ हजार कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी मुंबईत विविध ठिकाणी हे छापे पडले. अनिल अंबानी यांच्या मालकीचं रिलायन्स कम्युनिकेशन आणि त्यांच्या संचालकांच्या घरी हे छापे टाकले.
१३ जून रोजी स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशनला दिलेलं कर्ज ‘फसवणूक’ या श्रेणीत वर्ग केलं होतं. १७ हजार कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीनं अनिल अंबानी यांचं कार्यालय आणि इतर ठिकाणी छापे टाकून काही वस्तू जप्त केल्या होत्या, तसंच त्यांची चौकशी केली होती.